🕒 1 min read
मुंबई: भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचं नाव सध्या चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे संतोष परब हल्ला प्रकरण. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाआघाडीचे प्रचारप्रमुख आणि शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला नीतेश राणे आणि गोट्या सावंत ह्या दोघांच्या सांगण्यावरुन केल्याचा आरोप फिर्यादी संतोष परब यांनी केला आहे. दरम्यान आता या प्रकरणावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या उपन्या लोकांनी संतोष परब (Santosh Parab) यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांनी परब यांच्यावरील हल्ल्यावर प्रश्न का उपस्थित केला नाही? सिंधुदुर्गात गेल्या तीसेक वर्षात अनेक राजकीय हत्या करण्यात आल्या व पचवून ढेकर देण्यात आले. राजकीय वरदहस्ताशिवाय ते शक्य नाही. श्रीधर नाईकापासून रमेश गोवेकरांपर्यंत ज्या हत्या झाल्या त्याच मालिकेत संतोष परबांनाही बसवायचे होते. असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान यातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून, हल्ला करून माझ्या हत्येचा कट आखला होता, असा खळबळजनक दावा करत या घटनेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पोलीस अधिकारी सामील असल्याचा आरोप केला होता. यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजपचे एक आमदार पडळकर यांनी पाटलांनी आपल्यावर कसे मारेकरी घातले व आपण त्यातून कसे बचावलो याचे रसभरीत वर्णन केले व विरोधी पक्षनेते फडणवीसांनी त्यावरून सरकारवर हल्ले केले. विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिष्ठा अशामळे कमी होत असते याचे भान तरी माजी मुख्यमंत्र्यांनी ठेवायला नको काय? असा सवाल करत पडळकर यांचे प्राण मोलाचे व संतोष परब यांचे मातीमोलाचे असे विरोधी पक्षनेत्यांना वाटत असेल तर ते योग्य नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी या हल्ल्याकडे गांभीर्याने पहायला हवे व त्याचा तटस्थ अहवाल केंद्राकडे पाठवायलाच हवा. अशी मागणी केली आहे.
नितेश राणेंना अटक होणार का?
दरम्यान चाकू हल्ला प्रकरणी परब यांनी नितेश राणेंविरोधात (Nitesh Rane) तक्रार दिली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी (Kankawli Police) चौकशीसाठी बोलावले होते. मात्र नितेश राणे हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. याप्रकरणी काल सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात (Sindhudurg District Sessions Court) निलेश राणेंच्या अटकपूर्व जामीनासाठी सुनावणी झाली. ती न्यायालयाने फेटाळली आहे. आज (२९ डिसेंबर) दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी होणार असून नितेश राणेंना जेल की बेल? हे स्पष्ट होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराच्या दृष्टीने विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर केले’, भाजपचा आरोप
- ‘कुणावर हल्ला घडवून आणण्याची वृत्ती वाळव्याच्या पाटलांची नाही’, राऊतांकडून जयंत पाटलांची पाठराखण
- “भाजप पुढाऱ्यांच्या डोक्याचा केमिकल लोचा”, संजय राऊतांची खोचक टीका
- “विरोधी पक्ष मांजरीचा वंशज असल्याने…” ; शिवसेनेची खोचक टीका
- ‘…याने विद्यापीठाचा सत्यानाश होईल, तुमच्या PA कडे रांगा लागतील’, चित्रा वाघ यांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

