Share

‘मविआ’ने अल्टीमेटम देताच राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बंद लिफाफ्यात पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याच्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरुन महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घ्यावी, यावर भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) अडुन बसले आहेत. तर महाविकास आघाडी सरकार आवाजी पद्धतीने निवडणूक घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे आज विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना आज सकाळी ११ वाजेचा अल्टिमेटम दिला होता. सकाळी ११ वाजेपर्यंत महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या उत्तराची वाट पाहिली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बंद लिफाफ्यात मुख्यमंत्र्यांना उत्तर पाठवले आहे. या बंद लिफाफ्यात काय उत्तर पाठवलं हे मात्र समजू शकले नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीवर आघाडीचे नेते काय निर्णय घेणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

निवडणूक होणारच अशी महाविकास आघाडीने घेतलेली ठाम भूमिका यामुळे आज काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच महाविकास आघाडीने आपल्या सर्वच्या सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीने व्हीप जारी करताच भाजपनेही आमदारांना व्हीप जारी केल्याने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!