🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्रात ठाकरे सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा असताना त्या बहुमताचा अनादर करायचा व सरकार बरखास्तीचे तुणतुणे वाजवायचे ही कसली तरहा? महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षांची निवड कोणत्या मतदान पद्धतीने करावी? ती डोकी मोजून करायची की, आवाजी मतदानाने करायची? हा विधानसभेचा अधिकार. सरकारने या प्रक्रियेबाबत राज्यपालांना कळवायचे असते व घटनेनुसार राज्यपालांनी ‘मम’ म्हणायचे असते. असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीवरून सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
१२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल वर्षभर अभ्यास करीत बसले आहेत. तसे त्यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीबाबतही केले. प्रत्येक वेळी बहुमताचा, लोकप्रिय सरकारचा अनादर करायचा, सरकारची कोंडी करायची व पायात पाय अडकवायचा हे घटनाविरोधी आहे. महाराष्ट्राच्या भाजप पुढाऱ्यांनी या घटनाबाह्य कृतीचे समर्थन हे चांगल्या, निरोगी राजकीय प्रकृतीचे लक्षण नाही. मदांध हत्तीप्रमाणे लोक वागत आहेत, असे म्हणावे तर त्यांना गजराजाची उपमाही देता येत नाही, पण नक्कीच हे लोक मदांध झाले आहेत व सत्ता येत नाही, सरकार पडत नाही या तणावाने त्यांच्या डोक्याचा ‘केमिकल लोचा’ झाला आहे. असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
भाजप पुढारी काय बोलतात, काय करतात याचे ताळतंत्र राहिलेले नाही. एकेकाळी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हा वाघासारखा डरकाळ्या फोडीत होता व सिंहासारख्या गर्जना करीत होता. संयुक्त महाराष्ट्र लढय़ापासून वेळगावच्या लढय़ापर्यंत विरोधी पक्षाचे नेतेच महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज बनून लढे देत होते. महाराष्ट्राच्या पक्षाला एक महान परंपरा लाभली आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणांना सभागृह सर्व गॅलऱ्या गच्च वाहत असत. पक्ष हा सरकारइतकेच महत्त्वाचे कार्य करीत असे, पण आजचा विरोधी पक्ष विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ‘मांजरचेष्टा करतो. डरकाळ्यांच्या जागी मांजरीचे आवाज काढून स्वत:चे हसे करून घेतो. विरोधी पक्षाची अवस्था आज शरीर मांजराचे काळीज उंदराचे अशीच झाली आहे. माणसाच्या चित्रविचित्र चाळ्यांना आपल्याकडे ‘माकडचेष्टा’ म्हटले जाते. कारण माणूस माकडाचा वंशज आहे. राज्यातील आजचा विरोधी पक्ष मात्र मांजरीचा वंशज असल्याने तो जे काही उलटसुलट करीत आहे त्या ‘मांजरचेष्टा’च ठरत आहेत.अशी खोचक टीकाही संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराच्या दृष्टीने विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर केले’, भाजपचा आरोप
- “विरोधी पक्ष मांजरीचा वंशज असल्याने…” ; शिवसेनेची खोचक टीका
- ‘…याने विद्यापीठाचा सत्यानाश होईल, तुमच्या PA कडे रांगा लागतील’, चित्रा वाघ यांचा घणाघात
- तुम्हाला ते जमलं नाही निदान नाच्याचं काम तरी नीट करा; भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार
- नारायण राणेंकडून भास्कर जाधवांना ‘नाचा’ची उपमा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
