Share

…नाहीतर आमदार, खासदार धर्म नष्ट करतील- कालीचरण महाराज

Published On: 

बारामती :  शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात अनेक मुद्यांवरून चर्चा रंगू लागल्या आहेत. इतकंच नाहीतर धर्म, राष्ट्र यांसारख्या विषयांवरही बोललं जात आहे. अशातच याचसंदर्भात आता धर्मगुरू कालीचरण महाराज यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. धर्म वाचावायचा असेल, तर हिंदू वोटर बँक तयार करायला हवी. ती बनण्यासाठी त्याआधी जातीयवाद, धर्मवाद प्रांतवाद हे मुख्य अडथळे आहेत. हे वाद नष्ट करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर आमदार, खासदार धर्म नष्ट करतील असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.

दहशतवाद संपवण्यासाठी राजकारणाचे हिंदुत्ववादामध्ये रूपांतर होणे गरजेचे आहे. राजा म्हणजे आमदार, खासदार, जेवढा राजा हिंदुत्ववादी तेवढं हिंदू धर्माचे कल्याण होईल, असंही कालीचरण महाराज यांनी सांगितलं. आपण ज्या देव देविताना पूजत आहोत. ते सर्व राजे महाराजे होते. ते दृष्ट राज्यांच्या संहारासाठी निरंतर लढत होते.

त्यामुळे आपल्याला आपल्या भागातून हिंदुत्ववादी नेते राजकारणात निवडून दिले पाहिजेत.तसेच, शत प्रतिशत मतदान हे हिंदूंना करावं लागणार आहे. कट्टर हिंदुत्ववादी नेते निवडून द्या. याची सुरुवात शिंदे सरकार सत्तेत येऊन झाली त्याचा मला आनंद आहे, असंही त्यांनी सांगितलं

धर्माचे रक्षण केले तर राष्ट्राचे रक्षण होईल, हिंदुस्तान हे हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हायला पाहिजे. त्यामुळे जो नेता हिंदुत्ववाची भाषा करेल त्याला निवडून द्या, असं आवाहनही कालीचरण महाराज यांनी जनतेला केलं असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!