🕒 1 min read
जळगाव : शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षामध्ये खूप मोठी फूट पडली असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर एकमेकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळीही चांगलीच रंगलेली दिसत आहे. अशातच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातानआ मी उद्धव ठाकरेंना भेटून गेलो. त्यांच्याकडे मी आमदारांची कैफियत मांडली होती. त्यात त्यांनी दुरुस्ती केली तर बरं झालं असतं. असं म्हणतात शिवाजी महाराजही युद्धात तह करायचे. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी थोडा तह केला असता तर ही वेळ आलीच नसती, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंकडे मी 20 आमदार घेऊन गेलो होतो. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्वात पहिला गेलेला मी आमदार नाही. 32 आमदार गेल्यानंतर 33 वा मी असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.
तसेच, काल शिवसेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा जळगावमध्ये दौरा होता. यावरूनही गुलाबराव पाटलांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अडीच वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरले असते तर ही वेळ आली नसती. 32 वर्षाचे तरुण होते. ते राज्यभर फिरू शकले असते. हीच अपेक्षा होती. त्या काळातील अपेक्षा ते आज पूर्ण करत आहेत. परमेश्वर त्यांचं भलं करो, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrasekhar Bawankule । “आमचं सरकार 18 घंटे काम करणारे, पण आधीचे मुख्यमंत्री 18 महिने…”; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
- Jitendra Awhad| “बिलकीस बानू प्रकरणातील दोषींप्रमाणे इतरांना देखील न्याय…” जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रीया
- Chandrasekhar Bawankule । गोविंदा आरक्षणाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे – चंद्रशेखर बावनकुळे
- Amol Mitkari । “रात्री अंधारात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणारे सत्तार हे दिव्य पुरुष आहेत”; मिटकरींनी उडवली खिल्ली
- Deepak Kesarkar| दीपक केसरकर यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात, “मुख्यमंत्रीपद अन् मंत्रीपद घरी ठेवलं…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
