Share

Shahajibapu Patil | …तर बेळगावात घुसून महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करू – शहाजी बापू पाटील

Published On: 

🕒 1 min read

Shahajibapu Patil | सोलापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा केला होता. अक्कलकोट आणि सोलापूर हे देखील कर्नाटकचाच भाग असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पुन्हा एकदा पेटला. कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील 40 गावांना पाणी दिले आणि या 40 गावांनी कर्नाटकात विलीन होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असा इशारा दिला होता. यावर शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी आव्हान दिलं आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात येवू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा दिला होता. दरम्यान, पक्षाने आदेश दिल्यास आपण गनिमी काव्याने बेळगावात जावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करू, असे शहाजी बापू पाटील म्हणाले. यापूर्वी राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आपण बेळगावात जावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार असल्याचे जाहीर केले आहे.

उद्धव ठाकरे यांचा घणाघात –

उद्धव ठाकरे म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबईत कर्नाटक भवन बांधत आहेत. बेळगावमध्ये येऊ नका, असे पत्र आपल्या मुख्यमंत्र्यांना पाठवता. मात्र, याविरोधात आपले मुख्यमंत्री ब्र सुद्धा उच्चारत नाहीत. अद्याप मुख्यमंत्री शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.”

“महाराष्ट्राला मिंधे सरकारची फळ भोगावी लागत आहेत. मिंधे सरकार हे दिल्लीश्वरांचे पाय चाटण्यातच धन्यता मानत आहेत. त्यांच्याकडून अभिमान, स्वाभिमानाची अपेक्षा नाही. एकीकडे कर्नाटक महाराष्ट्रातील गावातील पाणी सोडून ते गाव घशात घालण्याचा डाव रचतोय. तर, दुसरीकडे, आपले मिंधे सरकार मात्र, सत्तेच्या पाण्यात गटांगळ्या खात आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!