नवी दिल्ली : माजी भारतीय यष्टीरक्षक पार्थिव पटेलने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली ज्या प्रकारे बाद झाला. त्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला विराट ज्याप्रकारे बाद झाला, त्यावर तुम्ही काहीच बोलू शकत नाही.
क्रिकबज बरोबर बोलताना पार्थिव म्हणाला की, “विराट बाद होण्याअगोदर किती भारी खेळत होता. फिरकी गोलंदाजाना मदत करणाऱ्या पिचवर फलंदाजी करणे खूप कठीण होते. तो म्हणाला विराट ज्याप्रकारे बाद झाला. त्यावर तुम्ही आरोप लावू शकत नाही. पिच इतकी खराब आहे. की त्यावर तुम्ही काहीच बोलू शकत नाही. चेंडू खूप वळत होता, आणि खालीही राहत होता. माझ्यामते तो खूप भारी खेळत होता.
तो पुढे म्हणाला की, विराट स्व:तावर जास्त नाराज नसेल. कारण त्याचे दुर्भाग्य की चेंडू खालून आला. तुम्ही अशा चेंडूवर काहीच करू शकत नाही. तुम्ही ड्रेसिंग रूममध्ये जाऊन एवढेच म्हणू शकता की आज माझा दिवस नव्हता.”
विराट या सामन्यात ३१ धावा करून बाद झाला. भारताचा पहिला डाव २५२ धावांवरती संपला. तर श्रीलंकेचा पहिला डाव ६ बाद ८६ धावांवर मुश्किल अशा स्थितीत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

