Share

“….अब सब सडेंगे सालोसाल”- अनिल बोंडेंचा राज्यसरकारला इशारा

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : राज्यातील पोलिसांच्या बदल्यांची गोपनीय माहिती उघड केल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. यावर भाजप आक्रमक झाली आहे. यातच आता आमदार डॉ. अनिल बोंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बोंडे म्हणाले कि, एकट्या देवेंद्र फडणवीसांनी गैरव्यवहार करणाऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळेच फडणवीस यांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या घटनेचा विरोध करण्यासाठी आम्ही एसपी ऑफिसमध्ये काळी फित लावून विरोध करणार आहोत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख कैदेत आहेत. नबाब मलिकही जेलमध्ये आहेत. आता अनिल परब यांचा नंबरही लवकरच येऊ शकतो. टरबुजा हुआ लाल अब सब सडेंगे सालोसाल, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. तसेच राष्ट्रवादीचे बहुतेक सर्व नेते भ्रष्टाचाराने माखले आहेत. ते सर्व आता जेलमध्ये जाणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या प्रकाणावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात एक बातमी समोर आली होती. त्यावर आम्ही लक्ष ठेवत या सगळ्या प्रकरणासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश इंटेलिजन्स युनिटच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिले होते. रश्मी शुक्ला यांनी या संदर्भात सगळी माहिती घेत संपूर्ण अहवाल तयार केला. अतिरिक्त मुख्य सचिवांच्या परवानगीने नंतर कॉल रेकॉर्डींग केले जावू लागले. त्यात काही मोठे अधिकारी, राजकीय लोक बाहेर आले. यानंतर हा अहवाल त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन डीजी सुबोध जैस्वाल यांना सुपूर्द केला होता. जैस्वाल यांनी हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. हा अहवाल गेल्या सहा महिन्यांपासून धूळखात पडला आहे.”

सरकारने त्यावर कारवाई केली पाहिजे. परंतु, घोटाळा उघड करणाऱ्यांचीच उलट चौकशी करत आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून माझ्याकडे काही विशेष अधिकार आहेत. माझ्या माहितीचा स्त्रोत सांगणे मला बंधनकारक नाही. तसेच बोंडें म्हणाले कि, फडणवीस आणखी रेकॉर्डिंग समोर आणतील याची भीती बऱ्याच मंत्र्यांना आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!