🕒 1 min read
वाशिम : सध्या सुगीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना उन्हाच्या झळ्यांऐवजी ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी अनुभवयास मिळत आहेत. अवकाळी पावसाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात अधिक झाला आहे. पण काही भागांमध्ये केवळ ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आता वातावरण निवाळल्याने पुन्हा रब्बी पिकांच्या काढणीची लगबग सुरु झाली आहे. काढणीला आलेले हरभरा, गहू, ज्वारी हे पिक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.
हरभऱ्याचे सर्वाधिक क्षेत्र –
यावर्षी हरभरा पिक जोमात आहे. जिल्ह्यात हरभऱ्याचाच अधिकचा पेरा झाला आहे. तसेच एकाच वेळी गहू, हरभरा आणि आता ज्वारी ही पीके काढणीला आल्याने शेतकऱ्यांची कामे अधिक वाढली आहेत. पोषक वातावरणामुळे सर्वच पिकांचे उत्पादन वाढणार, अशी दाट शक्यता वर्तविली आहे. तसेच सुगी पूर्ण होईपर्यंत पावासाने हजेरी लावू नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.
काढणी कामे काळजीपूर्वक करा –
काढणीला आलेल्या पिकांनाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. शिवाय काढणी झाली की पीक वावरात न ठेवता सुरक्षित ठिकाणी शेतकऱ्यांना ठेवावे लागणार आहे. सध्या वातावरण निवळले असले तरी हे अवकाळी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावध राहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
