नवी दिल्ली : इंग्लंड आणि वेस्टइंडीज यांच्यात एंटीगुआ येथे खेळला गेलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. हा सामना ५ दिवस चालूनही सामन्याचा निकाल लागला नाही. या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या क्रुमाह बोनर याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ३११ धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडीजने आपल्या पहिल्या डावात ३७५ धावा करून पहिल्या डावात ६४ धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडने दुसऱ्या डावात ६ विकेट्स गमावून ३४९ धावांवर डाव घोषित केला. विंडीजने आपल्या दुसऱ्या डावात ४ विकेट्स गमावून १४७ धावा केल्या. परंतु सामन्याचे ५ दिवस संपल्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला.
इंग्लंडने २१७ धावांवरून ५ व्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. जो रूट आणि जॅक क्रोली यांनी दुसऱ्या विकेटसाठी २०१ धावांची भागीदारी केली. क्रोलीने १२१ तर कर्णधार रूटने १०९ धावा केल्या. त्यामुळे त्यांनी ३४९ धावांवर दुसरा डाव घोषित केला.
दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या, विंडीज संघाकडून फलंदाजीसाठी आलेल्या जॉन कॅम्पबेल आणि कर्णधार क्रेग ब्राथवेट यांनी ५९ धावांची भागीदारी केली. ब्राथवेटने ३३ तर क्याम्प्बेल २२ धावा करून बाद झाला. त्यानंतर क्रुमाह बोनरने नाबाद ३८ व जेसन होल्डर नाबाद ३७ धावा केल्या. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जॅक लिच सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

