Share

“आठवलेंचा पक्ष भाजपच्या दावणीला, ते काय शिवसेनेवर…”, गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : काल(१२ मार्च)रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप देवरे (Sandip Devare) यांनी पिंपळनेर येथे आदिवासी दलित बहुजन मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना रामदास आठवलेंनी शिवसेनेवर टीकास्त्रांचा वर्षाव केला. शिवसेना स्वबळावर लढली तर शिवसेनेचे तीन चार खासदारही निवडून येणार नाही. शिवसेनेची परिस्थिती काँग्रेससारखी झाली आहे, असा घणाघात आठवलेंनी केला. दरम्यान, आठवलेंच्या या टीकेवर आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना गुलाबराव पाटील म्हणाले की,‘रामदास आठवले यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला आहे. ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील’, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘आठवले म्हणजे भाजपचे कुणी निर्णायक नेते नाहीत. त्यांनी बोलण्या अगोदर भाजप तसेच शिवसेनेच्या नेत्यांची परवानगी घ्यावी. त्यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. आठवलेंसारख्या नेत्यांना असं बोलणं शोभत नाही’, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!