Share

“नवोदितांचा अभिनयापेक्षा ग्लॅमरवर फोकस जास्त” -अभिनेत्री उषा नाडकर्णी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री उषा नाडकर्णी ‘सुंदर माझे घर’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर  पुनरागमन करत आहेत. या मालिकेत उषा या पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सुकन्या मोने, सतीश पुळेकर आणि संचिता कुलकर्णी हे कलाकार देखील दिसणार आहेत. या मालिकेनिमित्त ‘ई टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या नवीन भूमिकेबद्दल, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये झालेल्या बदलांबद्दल, नवोदित कलाकारांबद्दल त्यांना काय वाटतं, याबद्दल सांगितलं. यावेळी त्यांनी इंडस्ट्रीतील काही कलाकारांना टोलादेखील लगावला आहे. हल्लीच्या अभिनेत्री या अभिनयापेक्षा आयलाईनवरच जास्त फोकस करतात, असं त्या म्हणाल्या. शिवाय कलाकारांच्या मराठी उच्चारांवरूनही त्यांनी शाळा घेतली.

“छोट्या पडद्यावर काम करण्यास नकार देणारे ओव्हरस्मार्ट”

“मी काही कलाकारांना पाहिलंय, जे म्हणतात की ते आता टीव्हीवर काम करणार नाहीत. कारण ते चित्रपटांमध्ये काम करत आहेत. मला वाटतं की ते ओव्हरस्मार्ट वाटतात आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या हाती कोणती तरी सुपरपॉवर आहे. मी माझ्या कारकिर्दीत अनेकांना पाहिलंय, की आधी अभिनेते टीव्हीबद्दल बरं वाईट बोलतात, नंतर चित्रपट निवडतात आणि जेव्हा त्यांना एकही चित्रपट मिळत नाही किंवा त्यांचे चित्रपट चालत नाहीत, तेव्हा ते पुन्हा टीव्हीकडे वळतात. माझ्याबाबतीत असं नाहीये. माझ्यासाठी अभिनय महत्त्वाचा आहे, मी माध्यमाची पर्वा करत नाही. मग ती वेब सीरिज असो, टीव्ही सिरिअल असो किंवा चित्रपट असो, चांगले काम असेल तर मी नक्की करेन”, असं त्या म्हणाल्या.

“नवोदितांचा अभिनयापेक्षा ग्लॅमरवर फोकस जास्त”

नवोदित कलाकारांबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या, “मी माझ्या आयुष्यात अगदी लहान वयातच काम करायला सुरुवात केली. मी आता 75 वर्षांची आहे आणि अजूनही काम करतेय आणि लोकांना माझं काम आवडतंय हे मला माहीत आहे. मी कामावर जास्त लक्ष केंद्रित केलं, पण इंडस्ट्रीत येणारे नवोदित कलाकार हे त्यांच्या अभिनयकौशल्यापेक्षा ग्लॅमरवर अधिक लक्ष केंद्रित करताना दिसतात. दुर्दैवाने, आजच्या अभिनेत्रींचं फोकस हे डोळ्यांच्या हावभावापेक्षा आयलाईनरवर जास्त असतं. त्या बॉलिवूड किंवा इतर कोणत्याही प्रादेशिक उद्योगात केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी येतात.”

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!