मुंबई : RBIने आज लघु मुदतीचे कर्ज घेण्याची मुदत 30% वरून 60%वर वाढवली आहे. त्यामुळे राज्यातील जनते करिता राज्य सरकारने आतातरी आर्थिक पॅॅकेज जाहीर करावे अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे. ही मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित केली आहे.
त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की, राज्याने कर्ज घेण्याकरिता RBIच्या परवानगीची आवश्यकता असते. आज RBIने या कर्ज घेण्याच्या मुदत 30% वरून 60%वर वाढवली आहे. त्यामुळे आता राज्याकडे पैसे नाहीत किंवा कर्ज उभ राहू शकत नाही. अशा प्रकारची करणे देता येणार नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने तत्काळ येत्या 24 तासात शेतमजूर, रिक्षाचालक, शहरी गरीब, अशा सर्वांकरिता आर्थिक पॅॅकेज जाहीर करावे.

दरम्यान आरबीआय (भारतीय रिझर्व बँक)चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आर्थिक बाबींवर भाष्य केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर RBI लक्ष ठेऊन आहे. येणाऱ्या काळात आर्थिक संकट असले तरी इतर देशांच्या तुलनेने आपली आर्थिक स्थिती ही बरी आहे.
तसेच RBIने वित्तीय संस्थांना 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले असून रिव्हर्स रेपो दर 25 बेस पॉइंटने कमी केला आहे. जेणेकरुन यामुळे बँकांची गुंतवणूक वाढविली जाईल. रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दर 4% वरुन 3.75% पर्यंत कमी केला. तर रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही.


