Share

IPL 2022 RR vs GT: ‘आम्ही लक्ष्याचा पाठलाग करू शकलो असतो, पण…’; पराभवानंतर संजू सॅमसनचे मोठे वक्तव्य

Published On: 

मुंबई: IPL 2022 चा २४वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये गुजरातने टेबल टॉपर्सचा ३७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने राजस्थानला १९३ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. ज्याचा पाठलाग करताना राजस्थानला २० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात १५५ धावाच करता आल्या. अशा परिस्थितीत हा महत्त्वाचा सामना गमावल्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने मोठे वक्तव्य केले आहे.

गुजरात टायटन्स (gujarat titans) विरुद्ध सामना गमावल्यानंतर संजू सॅमसन (sanju samson) म्हणाला, “गुजरातने १० – १५ धावा अतिरिक्त केल्या, असे तुम्ही म्हणू शकता. पण मी त्याच्या फलंदाजांना श्रेय देऊ इच्छितो. हार्दिकने खूप चांगली खेळी खेळली, तो स्कोअर मिळवण्यासाठी खरोखरच चांगला खेळला. जर आमच्या हातात विकेट्स असत्या तर मला वाटते की ते लक्ष्याचा पाठलाग केला असता. रनरेटच्या बाबतीत आम्ही जवळपास होतो, पॉवरप्लेमध्ये आमचा रन रेट खूप चांगला होता, पण आम्ही विकेट गमावत राहिलो.”

गेली अनेक वर्षे राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद भूषवणाऱ्या संजू सॅमसनला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. त्याला या स्पर्धेची चांगलीच माहिती आहे. अशा परिस्थितीत संजूने सामन्यानंतर आयपीएलचा प्रत्येक खेळ महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. तो सामना संपल्यानंतर म्हणाला, “प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे हे समजून घेण्यासाठी मी या लीगमध्ये इतकी वर्षे खेळलो आहे. शिकणे आणि पुढच्या सामन्यात दमदार पुनरागमन करणे खूप महत्त्वाचे आहे.”

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!