मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जोमात साजरी करा, असे आवाहन केले होते. मात्र राज ठाकरे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर गेले नाही. यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
“लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण” असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यांच्यावर जास्त लक्ष न देता त्यांना वेळ आली की आम्ही उत्तर देऊ. सध्या त्यांना टीका करण्यासाठी भरपूर रिकामा वेळ मिळतो. करत राहा. आम्ही कामे करूम दाखवू आणि लोकांपर्यंत जाऊ, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी नालेसफाई वरून होणाऱ्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्आधव ठाकरे,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि आघाडीचे आमदार सर्वजण मुंबईत पाणी तुंबणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. नालेसफाई प्रत्येक 6 महिन्यानंतर केली जाते. आयुक्तांनी या संदर्भात भरारी पथक देखील नेमले आहे. स्वतः आयुक्त चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबणार नाही आणि तुंबले तर जास्त वेळ राहणार नाही, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “मेरा आवाज हिंदुस्थान का आवाज…” कोर्टाबाहेर सदावर्तेंनी दिल्या घोषणा
- गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी; सातारा जिल्हा न्यायालयाचा निर्णय
- IPL 2022 RR vs GT: ‘आम्ही लक्ष्याचा पाठलाग करू शकलो असतो, पण…’; पराभवानंतर संजू सॅमसनचे मोठे वक्तव्य
- IPL 2022 RR vs GT: ये क्या हो रहा है! इंच टेप घेऊन हार्दिकची मैदानावर एंट्री ; मजेदार VIDEO व्हायरल
- जेएनयूच्या गेटवर झेंडे, पोस्टर्सवर लिहले भगवा जेएनयू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

