सातारा : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता चार दिवस सदावर्ते यांचा मुक्काम पोलीस कोठडीत राहणार आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. खासदार संभाजीराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. २०२० मधील हे प्रकरण आहे. सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. आज कोर्टात त्यांना हजार करण्यात आले. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
आज सकाळी सदावर्ते यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयात हजार करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकील अंजुम पठाण यांनी सदावर्ते यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी जोरदार युक्तिवाद केला. सदावर्ते यांनी कोणाच्या सांगण्यावरून राजघराण्यावर अफझल खानाचे वंशज असल्याचा उल्लेख केला याचा तपास पोलिसांनी करायचा आहे. यामुळेच सदावर्ते यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.
सदावर्ते यांच्या वकिलांनी पोलिसांच्या नोटिशीतील त्रुटी दाखवत जमीन देण्याची मागणी केली होती. सदावर्ते यांना बजवण्यात आलेल्या नोटीसमध्ये तारीखच नाही आणि त्यांच्यांकडून कसलीही रिकव्हरी करायची नाही. त्यामुळे सदावर्ते यांना जमीन देण्याचा युक्तिवाद त्यांचे वकील सचिन थोरात यांनी केला होता. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून सदवर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
महत्वाच्या बातम्या :
- IPL 2022 RR vs GT: ये क्या हो रहा है! इंच टेप घेऊन हार्दिकची मैदानावर एंट्री ; मजेदार VIDEO व्हायरल
- जेएनयूच्या गेटवर झेंडे, पोस्टर्सवर लिहले भगवा जेएनयू
- दिशा सालियन ते विक्रांत घोटाळा करणाऱ्या आरोपींना दिलासा कसा मिळतो?; संजय राऊतांचा सवाल
- IPL 2022 RR vs GT: कॅप्टन्स इनिंग खेळणाऱ्या हार्दिकचे एक तिर में दोन निशाणे; सामना तर जिंकला सोबतच…
- “…नंतर येत आहे ‘टॉयलेट एक लव्ह स्टोरी’”; संजय राऊतांचा ट्वीट करत इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

