🕒 1 min read
सातारा : आज सातारा जिल्हा सत्र न्यायालयात वकील गुणरत्न सदावर्ते यांना हजर करण्यात आले होते. पोलिसांच्या गाडीतून उतरवून सदावर्ते यांना न्यायालयात नेत असताना सदावर्ते यांनी जोरदार घोषणा दिल्या. पोलिसांच्या ताब्यात असतानाही सदावर्ते यांनी वेगळ्याच आवेशात जोरदार घोषणा दिल्या.
सदावर्ते यांना न्यायालयात हजार करताना, न्यायालयाबाहेर सदावर्ते यांनी घोषणा दिलेल्या माध्यमात चर्चेचा विषय ठरल. “भारत माता कि जय, वंदे मातरम, मेरा आवाज हिंदुस्थानका आवाज” अशा घोषणा सदावर्ते यांनी दिल्या आहेत. या घोषणांनी सदावर्ते यांच्याकडे सर्वांचे लक्ष वळले होते.
आज सकाळी सदावर्ते यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयात हजार करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकील अंजुम पठाण यांनी सदावर्ते यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी जोरदार युक्तिवाद केला. सदावर्ते यांनी कोणाच्या सांगण्यावरून राजघराण्यावर अफझल खानाचे वंशज असल्याचा उल्लेख केला याचा तपास पोलिसांनी करायचा आहे. यामुळेच सदावर्ते यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.
कोर्टाने सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
- IPL 2022 RR vs GT: ‘आम्ही लक्ष्याचा पाठलाग करू शकलो असतो, पण…’; पराभवानंतर संजू सॅमसनचे मोठे वक्तव्य
- IPL 2022 RR vs GT: ये क्या हो रहा है! इंच टेप घेऊन हार्दिकची मैदानावर एंट्री ; मजेदार VIDEO व्हायरल
- जेएनयूच्या गेटवर झेंडे, पोस्टर्सवर लिहले भगवा जेएनयू
- दिशा सालियन ते विक्रांत घोटाळा करणाऱ्या आरोपींना दिलासा कसा मिळतो?; संजय राऊतांचा सवाल
- IPL 2022 RR vs GT: कॅप्टन्स इनिंग खेळणाऱ्या हार्दिकचे एक तिर में दोन निशाणे; सामना तर जिंकला सोबतच…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
