मुंबई : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी आयोगापुढं चौकशी सुरु आहे. यावेळी चौकशी आयोगाने त्यांना विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली. यावेळी कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणाला, तेथे घडलेल्या हिंसाचाराला तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार जबाबदार असल्याचं शरद पवारांनी सूचकपणे म्हटलं आहे.
शरद पवार म्हणाले, जे काही कोरेगाव भीमा येथे घडलं ते दुर्दैवी होतं. अशी परिस्थिती नियंत्रित करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची होती, पण त्यांनी यामध्ये कुचराई केली. हे वेळीच थांबवता आलं असतं, पण थांबवलं गेलं नाही. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस जबाबदार असतात.
कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही पोलिसांची होती. पोलिसांनी यावेळी योग्य ते काळजी आणि खबरदारी घेणे गरजेचे होते. पण योग्य वेळी कारवाई न करता पोलिसांनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यामुळेच ही दंगल घडून आल्याचा दावा पवारांनी चौकशी आयोगासमोर केला आहे.
दरम्यान, कोरेगाव भीमा दंगल घडून आला त्यावेळी म्हणजे २०१८ मध्ये राज्यात फडणवीस सरकार सत्तेत होतं. तसेच यावेळी गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडेच होती. पोलीस प्रशासन या घटनेला जबाबदार असल्याचं पवारांनी सांगितलं. सूचकपणे देवेंद्र फडणवीसच यासाठी जबाबदार असल्याचं शरद पवारांनी चौकशी आयोगापुढे सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


