🕒 1 min read
अकोला : अकोल्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी भोंग्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. आगामी निवडणूक मी भोंग्याशिवाय लढणार. तसेच सभेसाठी फक्त एक दिवस भोंग्याचा वापर करेल, अशी घोषणा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली आहे.
यावेळी बोलत असतांना बच्चू कडू म्हणाले की,‘येत्या निवडणुकीत मी फक्त सभेच्या दिवशीच भोंगे वाजवील, सभेशिवाय भोंगा वाजवणार नाही. कारण त्याचा सगळ्यात जास्त त्रास आहे.’ तसेच भोंग्याच्या आवाजामुळे निश्चितच प्रदुषण होतंय, मग ते भोंगे मंदिराचे असू दे, मस्जिदीवरील असू दे, बुद्ध विहार किंवा राजकीय लोकांचे भोंगे असू दे, असेही बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘निवडणुकीत भोंगे का वाजवायचे? आम्हाला मतं द्या, आम्हाला मतं द्या असं भोंग्यावर सांगण्याची काय गरज आहे. ते देखील बंद व्हावेत. यासाठी आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत’, असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “…या भानगडी सोडून द्या”, रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अर्जुन खोतकर यांची टीका
- IPL 2022 DC vs SRH : वॉर्नर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद! वाचा दोन्ही संघांची हेड-टू-हेड आकडेवारी
- ‘मर्सिडीज बेबी’ म्हणून डिवचणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- मोठी बातमी : नवनीत राणांची भायखळा कारागृहातून सुटका; हनुमान चालीसा प्रकरणी झाली होती अटक
- IPL 2022 CSK vs RCB : मुकेश चौधरीनं विराटला फेकून मारला बॉल..! पण नक्की झालं काय? पाहा VIDEO!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

