🕒 1 min read
पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये खेळल्या गेलेल्या ४९व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जला (CSK vs RCB) १३ धावांनी मात दिली. या विजयानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये आपला विजय साजरा केला. बंगळुरूच्या फलंदाजीदरम्यान त्यांचे दोन प्रमुख खेळाडू विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात गोंधळ उडाला आणि मॅक्सवेल रनआऊट झाला. मॅक्सवेलला केवळ तीन चेंडू खेळण्याची संधी मिळाली. मात्र, संघाच्या विजयानंतर मॅक्सवेलने विराटला गमतीने एक गोष्ट सांगितली.
आरसीबीच्या डावातील नवव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कोहलीने ऑफ साइडला फटका खेळला आणि धाव घेतली. मॅक्सवेलनेही दुसऱ्या टोकाकडून धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण तो पोहोचण्याआधीच महेंद्रसिंह धोनीने रॉबिन उथप्पाचा थ्रो पकडला आणि यष्ट्या उडवल्या. ड्रेसिंग रूममध्ये मॅचनंतरच्या सेलिब्रेशनदरम्यान मॅक्सवेलने गंमतीने म्हणाला, ”मी तुझ्याबरोबर फलंदाजी करू शकत नाही, तू खूप वेगाने धावतोस. तू एक आणि दोन धावांसाठी फटका खेळतोस, मी नाही.”
RCB v CSK, Dressing Room Celebrations
The smiles and laughter returned & the players celebrated the win with the customary victory song. We also asked Maxi, Harshal, Siraj and the coaches about last night’s win against CSK.#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/uW5hl7b4ko
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 5, 2022
या मजेदार संभाषणाची सुरुवात कोहलीने केली आणि ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करताच त्याने मॅक्सवेलला “सर्वात महान दुखापतग्रस्त खेळाडू” म्हटले. मॅक्सवेलला फलंदाजीत फारसे काही करता आले नसते, पण त्याने चांगली गोलंदाजी केली. चार षटकांच्या स्पेलमध्ये त्याने रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडूला बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

