🕒 1 min read
पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जला (CSK vs RCB) १३ धावांनी मात दिली. बंगळुरुने आयपीएलमधील सहाव्या विजयाची नोंद केली. या विजयासह आरसीबी संघाचे १२ गुण झाले असून ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने ३३ चेंडूत ३० धावा केल्या. मोईन अलीने कोहलीला बोल्ड केले. सामन्यात एक अशी घटना घडली, की चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने विराट कोहलीला चेंडू फेकून मारला आणि माफी मागितली.
चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आरसीबीच्या डावातील पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर विराट कोहलीने चौकार मारला. यानंतर मुकेशचा पुढचा चेंडू विराटने बचावात्मक पद्धतीने गोलंदाजाकडे खेळला. यादरम्यान विराट क्रीजवर पुढे गेला होता. मुकेशने चेंडू उचलला आणि तो थेट स्ट्राईक एंडला फेकला, जो कोहलीच्या मागच्या बाजूला लागला, त्यानंतर कोहली सूर मारत क्रीजवर परतण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर मुकेशने लगेचच विराटची माफी मागितली, विराटनेही हसून या गोष्टीला उत्तर दिले.
— Patidarfan (@patidarfan) May 4, 2022
असा रंगला सामना…
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ जवळपास आयपीएल २०२२ (IPL 2022) बाहेर झाला आहे. लीगच्या ४९व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईला (RCB vs CSK) १३ धावांनी मात दिली. महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिकच्या महत्त्वपूर्ण धावांच्या जोरावर बंगळुरुने चेन्नईला १७४ धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईकडून महिश थिक्षणाने तीन बळी घेतले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे वगळता इतर फलंदाज फ्लॉप ठरले. २० षटकात चेन्नईचा संघ ८ बाद १५९ धावांपर्यंतच पोहोचू शकला.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

