🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषेदेत विद्या चव्हाण यांचे नाव जाहीर केले. सध्या तरी राज्यातील जिल्हा कमिट्या तश्याच राहणार आहेत. मात्र यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विभागीय अध्यक्ष पद पहिल्यांदाच देण्यात आले आहे, असे खासदार फौजिया खान यांनी सागितले. यावेळी फौजिया खान यांनी विद्या चव्हाण यांना पदावर नियुक्ती झाल्याचे पत्र दिले.
रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपद मार्च महिन्यापासून रिक्त राहिले होते. या पदावर आता विद्या चव्हाण यांची वर्णी लागली आहे. राज्यातले विविध प्रश्न यानिमित्ताने आपण हाताळणार असल्याचे विद्या चव्हाण यांनी सांगितले.
विद्या चव्हाण म्हणाल्या, “महागाई सारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. महिला वर्ग त्रस्त झाला आहे. या प्रश्नांकडे लक्ष वाढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने जी संधी दिली आहे, जो विश्वास टाकला आहे. त्या विश्वासाला पात्र ठरेन.” माध्यमांकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा ही विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या :


