Share

मोठी बातमी : नवनीत राणांची भायखळा कारागृहातून सुटका; हनुमान चालीसा प्रकरणी झाली होती अटक

Published On: 

मुंबई: खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांची भायखळा कारागृहातून आज (५ मे) सुटका झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यासोबत आमदार रवी राणाही होते. दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं काल त्यांचा जामीन मंजूर केला. त्यानंतर आज त्यांची सुटका झाली आहे.

दरम्यान नवनीत राणा यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात नेले जाणार आहे. सध्या त्यांचे पती आमदार रवी राणा तळोजा कारागृहात असून त्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरु आहे.

राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ते गेल्या बारा दिवसांपासून कारागृहात होते. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांना बचाव पक्षाचा युक्तीवाद मान्य झाला. आणि अनेक अटींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या सुटका होताच नवनीत राणा यांची रुग्णालयात भेट घेणार असल्याचे त्यांनी ट्वीट करत सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!