टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरचं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला गळती लागली आहे. अनेक नेते पारंपारिक पक्षाला राम राम ठोकत भाजप – शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आता नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक हे देखील भाजप प्रवेश करत आहेत. 9 सप्टेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता नवी मुंबईतही राष्ट्रवादीला खिंडार पडणार आहे.
गणेश नाईक यांचे पक्षांतर राष्ट्रवादी कॉंग्रेसला महागात पडणार आहे. कारण गणेश नाईक हे आपल्या बरोबर नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे 55 नगरसेवक आणि अपक्ष 2 नगरसेवक भाजपात घेऊन जाणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेवर आता भाजपचा झेंडा फडकणार असल्याचं दिसत आहे. नवी मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी 56 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे नाईक समर्थक नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता धोक्यात येणार आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी संदीप नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देत माजी महापौर सागर नाईक यांच्यासह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. पण गणेश नाईक व त्यांचे ज्येष्ठ पुत्र संजीव नाईक यांनी भाजपप्रवेशाबाबत मौन बाळगले होते. मात्र गेले काही दिवस गणेश नाईक हे भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. तसेच अनेक भाजप नेत्यांनी गणेश नाईक यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता गणेश नाईक यांनी भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केली आहे.
- औरंगजेबाला उभ्या हयातीत जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं – खा. कोल्हे
- माझ पवारांशी बोलण झाल, पुढचा निर्णय हर्षवर्धन पाटलांनी घ्यावा : अशोक चव्हाण
- कोणी कितीही प्रयत्न करा, आमदार तर राजळेचं होणार : सुजय विखे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

