Share

कोणी कितीही प्रयत्न करा, आमदार तर राजळेचं होणार : सुजय विखे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर नेते आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. तसेच मतदारांमध्ये विकासकामांची उजळणी करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे याच पुन्हा आमदार असतील असं विधान खासदार सुजय विखे यांनी पाथर्डी येथे केले आहे. तसेच ‘ज्यांना पक्षात यायचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात प्रवेश करून योगदान द्या, कार्य करा. त्यांचे काम पाहून पुढच्या वेळी त्यांचा विचार करू असंही विधान सुजय विखे यांनी केले आहे.

तसेच येणाऱ्या निवडणुकीत राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येऊन देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील. वांबोरी चारीचा विषय मुख्यमंत्र्यांकडून मार्गी लावून चारीचा टप्पा क्रमांक दोन बाबत लक्ष वेधू. राहुरी, नगर, नेवासे, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांतील सिंचन क्षेत्र चारीच्या पाण्यावर अवलंबून असून, पाथर्डी तालुक्यातील सर्व १०२  पाझर तलाव भरून मढी पर्यंत चारीचे पाणी आणण्याची जबाबदारी आपण व आमदार राजळे मिळून पार पाडू असं सुजय विखे म्हणाले.

दरम्यान, मोनिका राजळे या यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये होत्या. परंतू त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्या आमदार झाल्या. आणि आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनाच उमेदवारी मिळेल असं विधान सुजय विखे यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी राजळे यांना मिळणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!