Share

“रोजगार वाढविण्यासाठी देशाची सत्ता…”, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

अमरावती: महाराष्ट्रात आज आपली सत्ता आली, पण ज्यांच्या हातात सत्ता राहिली नाही अशा अस्वस्थ लोकांचा मोठा वर्ग राज्यात आहे. त्यामुळेच केंद्राची सत्ता वापरून महाराष्ट्र राज्य संकटात कसे आणता येईल, यासाठी अखंड प्रयत्न सध्या सुरू आहेत. अनेकांवर खटले भरले जातात, चौकशा केल्या जातात. मंत्रिमंडळातील दोन सहकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचे काम केले. सतत काहीना काही करून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला कसा त्रास देता येईल, असा एककलमी कार्यक्रम देशात सुरू आहे. अशा वेळेला आपली सामूहिक शक्ती आपण उभी केली, तर प्रयत्न हाणून पाडणे अशक्य नाही. असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी म्हटले आहे. ते अमरावती विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळाव्यात काल बोलत होते.

नेतृत्व चुकीचे असले तर त्याची किंमत कामगारांना चुकवावी लागते. एसटी कामगारांबाबत काय घडलं, हे लोकांनी टीव्हीवर पाहिलं. त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, सर्वसामान्य एसटी कामगारांना भडकावून चुकीच्या मार्गाला नेले असल्याचे दिसून येते. राजकारणात सार्वजनिक जीवनात काम करताना अनेक प्रकारची संकटे येतात. काही संकटे आयोजित केलेली असतात, काही अचानक परिस्थितीमुळे उद्भवतात. त्यांना न घाबरता तोंड दिले पाहिजे. कालचं संकट हे काही संकट नव्हतंच. कुणीतरी चिथावणी दिल्यामुळे तो प्रसंग घडला. त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज नाही. आज देशात वेगळ्या प्रकारचे वातावरण सुरू आहे. हिंदू-मुस्लिम दंगा करता येईल का, दलित-अदलित करता येईल का, याचा प्रयत्न केला जात आहे. जो धर्मा-धर्मात, जाती-जातींमध्ये, भाषांमध्ये वाद निर्माण करतोय, अशा प्रवृत्तीविरोधात संघर्ष करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार आहे. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

आज महाराष्ट्रात आपण तीन पक्षाचे सरकार निर्माण केले. समस्या आहेत, पण आपण तीनही पक्ष एकत्र बसून मार्ग काढत आहोत. केंद्राचे सहकार्य नसले तरी आपण सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत आहोत. आज देशाच्या पुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न महागाईचा आहे. इंधनाचे दर दररोज वाढत आहेत. देशातील शिक्षित पिढीला रोजगार मिळत नाही. रोजगार वाढविण्यासाठी देशाची सत्ता राबवायची असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. राज्यांना मदत करायची नाही, त्यांच्या अडचणी वाढवायच्या या प्रकारची भूमिका घेऊन जर केंद्र सरकार चालत असेल तर तुमची माझी जबाबदारी अधिक वाढते. जे एका विचाराचे आहेत, त्यांना सोबत घेऊन सामान्य माणसाचे दुखणे दूर केले पाहिजे. सांप्रदायिक विचार घेऊन माणसांमध्ये अंतर वाढविण्याचे काम कुणी करत असेल तर त्यांच्यासोबत संघर्ष करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पार पाडेल, असा विश्वास मला वाटतो. असे म्हणत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022 RR vs LSG : भांबावून टाकणारा सामना..! चुरशीच्या लढतीत राजस्थानची लखनऊवर ३ धावांनी सरशी

RR vs LSG : बोल्टनं दिला ४४० वोल्टचा धक्का..! शून्यावरच केएल राहुलचा उडवला त्रिफळा; पाहा VIDEO

IPL 2022 RR vs LSG : हेटमायरचा हिट शो..! राजस्थान रॉयल्सचं लखनऊला १६६ धावांचं आव्हान

VIDEO : आयपीएलमध्ये येताच वॉर्नरनं उडवला धुरळा..! चक्क मैदानातच केला ‘श्रीवल्ली’ गाण्यावर ‘नादखुळा’ डान्स; पाहा…

“उद्धव ठाकरे शिवसैनिकांना त्याग करायला सांगत आहेत” – चंद्रकांत पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!