Share

IPL 2022 RR vs LSG : हेटमायरचा हिट शो..! राजस्थान रॉयल्सचं लखनऊला १६६ धावांचं आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वानखेडेवर रंगणाऱ्या आयपीएल २०२२च्या २०व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सला १६६ धावांचे आव्हान दिले आहे. शिमरॉ़न हेटमायरच्या नाबाद ५९ धावांमुळे राजस्थानला दीडशेपार पोहोचता आले. या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

राजस्थानचा डाव

यंदा भन्नाट फॉर्मात खेळणाऱ्या जोस बटलरला आज लखनऊविरुद्ध चांगली सुरुवात करता आली नाही. वेगवान गोलंदाज आवेश खानने बटलरचा (१३) सुंदर त्रिफळा उडवला. दहाव्या षटकात कृष्णप्पा गौतमने संयमी खेळणारा देवदत्त पडिक्कल (२९) आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन (४) यांना बाद केले. त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि रवीचंद्रन अश्विनने फटकेबाजी केली. हेटमायरने अर्धशतक ठोकत संघाला दीडशेपार पोहोचवले. हेटमायरने १ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या. २० षटकात राजस्थानने ६ बाद १६५ धावा केल्या. लखनऊकडून जेसन होल्डर आणि कृष्णप्पा गौतम यांनी २-२ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing XI

राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कप्तान/यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, कुलदीप सेन, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल.

लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, आवेश खान.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!