🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा भारतासाठी किती खास आहे, हे सांगण्याची आपल्याला गरज लागत नाही. वॉर्नरला आपल्या चित्रपटसृष्टीबद्दल प्रेम आहे. तो अनेकदा चित्रपटातील गाण्यावर डान्स करत व्हिडिओ शेअर करतो. अल्लू अर्जुन फेम पुष्पा चित्रपटाच्या श्रीवल्ली गाण्यावर वॉर्नरने डान्स केला होता. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता त्याने आयपीएल२०२२मध्ये परतताच ग्राऊंडवर श्रीवल्ली डान्स केला आहे.
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात प्रेक्षकांना वॉर्नरचा डान्स पाहायला मिळाला. त्याचा हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. सनरायझर्स हैदराबादनंतर वॉर्नर आता दिल्ली कॅपिटल्समधून खेळत आहे. या वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात वॉर्नरला दिल्लीने खरेदी केले.
सामन्याबद्दल…
ब्रेबॉर्न स्टेडियमवर चाहत्यांना आयपीएल २०२२चा रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. चौकार-षटकारांची आतषबाजी झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सला ४४ धावांनी पराभूत केले. या सामन्यात कोलकाताचा कॅप्टन श्रेयस अय्यरने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली, पण हा निर्णय त्याच्या अंगउलट आला. सलामीवीर शॉ, वॉर्नर यांची अर्धशतके आणि शेवटी शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे दिल्लीने कोलकाताला २१६ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ १९.४ षटकात १७१ धावांपर्यंतच पोहोचू शकला. दिल्लीकडून फिरकीपटू कुलदीप यादवने ३५ धावांत ४ बळी घेत सामना दिल्लीच्या बाजूने झुकवला.
महत्त्वाच्या बातम्या –
- “उद्धव ठाकरे शिवसैनिकांना त्याग करायला सांगत आहेत” – चंद्रकांत पाटील
- “कोल्हापूरमधून भगवा पुसू देणार नाही” – उद्धव ठाकरे
- IPL 2022 KKR vs DC : कुलदीप यादवच्या ‘चौकारामुळं’ दिल्लीचा कोलकातावर ‘मोठा’ विजय!
- “कोरोनात थाळी वाजवली तशी रिकामा सिलेंडर वाजवायचा?”; मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला सवाल
- IPL 2022 RR vs LSG : लखनऊनं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
