Share

RR vs LSG : बोल्टनं दिला ४४० वोल्टचा धक्का..! शून्यावरच केएल राहुलचा उडवला त्रिफळा; पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वानखेडे मैदानावर आज आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना लखनऊसमोर १६६ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्त्युत्तरात फलंदाजीला उतरलेला लखनऊचा कप्तान केएल राहुल पहिल्याच चेंडूवर माघारी परतला.

राजस्थानचा तेजतर्रार गोलंदाज ट्रेंट बोल्डने राहुलचा काटा काढला. त्याने राऊंड द विकेटने मारा करत राहुलला आत येणाऱ्या चेंडूवर फसवले, राहुलला हा चेंडूच समजला नाही आणि तो क्लीन बोल्ड झाला. त्याचा हा यंदाच्या हंगामातील दुसरा गोल्डन डक आहे. लखनऊच्या पहिल्याच सामन्यात गुजरातच्या मोहम्मद शमीने राहुलला तंबूत पाठवले होते.

https://twitter.com/AmitKum50993580/status/1513192523040141312

राजस्थानचा डाव

यंदा भन्नाट फॉर्मात खेळणाऱ्या जोस बटलरला आज लखनऊविरुद्ध चांगली सुरुवात करता आली नाही. वेगवान गोलंदाज आवेश खानने बटलरचा (१३) सुंदर त्रिफळा उडवला. दहाव्या षटकात कृष्णप्पा गौतमने संयमी खेळणारा देवदत्त पडिक्कल (२९) आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन (४) यांना बाद केले. त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि रवीचंद्रन अश्विनने फटकेबाजी केली. हेटमायरने अर्धशतक ठोकत संघाला दीडशेपार पोहोचवले. हेटमायरने १ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या. २० षटकात राजस्थानने ६ बाद १६५ धावा केल्या. लखनऊकडून जेसन होल्डर आणि कृष्णप्पा गौतम यांनी २-२ बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!