Share

Vinayak Raut : “स्व:तच्या हातानं ट्वीट तरी करता येत का?” ; विनायक राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. रिक्षाच्या स्पीड पुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला आहे. यावर बोलताना शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून देतं म्हणून ट्वीट करायच. स्व:तच्या हातानं ट्वीट करता येत का हा अभ्यास करावा लागेल. एकनाथ शिंदे यांना माझ्या मध्यस्थिमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली त्याचा पश्चाताप होतो. आयुष्यातील मोठ पाप झालय.”

“मी सांगितलं नसत तर एकनाथ शिंदेना आमदारकी मिळाली नसती” अस राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रातल्या गावांना ओळखणारा एकमेव नेता म्हणजे उध्दव ठाकरे आहेत. राष्ट्रपती निवडूकीसाठी भाजपला पाठींबा पत्र. राष्ट्रपती निवडणूकीसाठी भाजप पुरस्कृत उमेदवाराला पाठींबा द्यावा असं पत्र राहूल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलय. या पत्रामुळे पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलय. लेखी पत्र देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटूनही सांगता आलं असतं त्यांचे दरवाजे उघडे होते. असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं.

शिवसेनेचे ३९ आमदार शिंदे गटात सामिल झाले. आता खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. १८ पैकी १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तर २२ माजी आमदार देखील संपर्कात असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. असंही विनायक राऊत यांनी यावेळी सांगितल.

त्याबरोबरच “मी तुमच्या कोणावर जबरदस्ती करणार आहे, जे मनापासून माझ्याबरोबर आहेत त्यांनी माझ्यासोबत राहा. तुमचं दुसरीकडे भविष्य उज्वल असेल तर जरूर जा” अस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर देखील विनायक राऊत यांनी यावेळी भाष्य केले आहे. एवढ्या मोठ्या मनाचा नेता आम्हाला लाभला यातच आम्हाला समाधान असल्याच राऊत यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!