Share

Ajit Pawar | “मुख्यमंत्री देखील थेट जनतेतून निवडा” ; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना प्रश्न

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. सलग दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. यानंतर आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान आज विरोधकांनी जनतेतून नगराध्यक्ष निवडीला जोरदार विरोध केला. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बोलताना मुख्यमंत्री देखील थेट जनतेतून निवडा, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.

“१९७४ साली नगराध्यक्ष संदर्भातील बिल सभागृहात आलं होत. लोकशाही मार्गाने ते बिल मंजूर करण्यात आलं होत. परंतु परत ते बिल ते मागे घेण्यात आलं. त्यानंतर पुन्हा १९८५-८६ मध्ये नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्यात आले. कारण पहिल्या काही वर्षाचा अनुभव काही चांगला नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगराध्यक्ष जनतेतून करायचं म्हणत आहेत. मग मुख्यमंत्री देखील जनतेतून करा. तुम्ही आधी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री केलं, त्यानंतर तुमच्या मनात आलं, तर तूम्ही ४० लोकांना बाहेर घेऊन गेलात. तुम्ही असं केलं कारण आमदारांमधून मुख्यमंत्री होत होता. मात्र नगराध्यक्ष तसे होत नाही. त्यांच्यामध्ये जर कुणाल एकनाथ शिंदे व्हायचं असेल तर ते साध्य होणार नाही”, असे अजित पवार म्हणाले.

शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास नाही-

यापूर्वी अजित पवार यांनी गुरुवारी सरकारवर निशाणा साधला की, नवे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या ४५ दिवसांत १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. असे असूनही मंत्री महोदय स्वागत कार्यक्रमाला जात आहेत. अभिनंदन करण्यात व्यस्त आहेत. ते म्हणाले की, राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास नाही, शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारी धोरणे सरकारने राबवावी.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!