Share

Viral Video | गेट उघण्यास उशीर झाला म्हणून महिलेचा गार्डसोबत अश्लील वाद, पाहा व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : दिल्लीजवळील एका महिलेला तिच्या सोसायटीच्या सुरक्षा गार्डसोबत गेट वरुन वाद घालणं चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित महिला ही गौतम बुद्ध नगरमध्ये रहिवासी आहे. झालेल्या वादानंतर महिलेला अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ व्हायरलः

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये संबंधित महिला ओरडताना तसेच अश्लील हावभाव करत आणि सुरक्षा रक्षकांपैकी एकाला धमकावत मारहाण करताना दिसली. यानंतर आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ती तिच्या स्वत:च्या कारमधून पोलिस स्टेशनला जात असल्याचं दाखवण्यात आलं यावेळी तिच्यासोबत पोलीस देखील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिची कार जप्त करायची होती मात्र तिने ती चालविण्याचा आग्रह धरला. तिला पोलिसांच्या गाडीत बसवायला हवं होतं असं नियम सांगतात.

त्यानंतर तिला न्यायालयात हजर केलं असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

गेट उघडण्यास झाला उशीरः

ही महिला काल नोएडाच्या सेक्टर 126 मधील जेपी विशटाउन सोसायटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा गेट उघडण्यास उशीर झाला. गेट उघडायला थोडा वेळ लागला त्यामुळे तिने आरडाओरडा आणि शिवीगाळ सुरू केली, असे सुरक्षा रक्षक करण चौधरी यांनी सांगितलं.

तर पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे संबंधित महिला ही दारुच्या नशेत होती. आरोपी महिलेचं नाव भव्या राय असं आहे. शिवीगाळ करताना, समाजातील सुरक्षा कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केल्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओः

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!