Share

Monsoon session | आमदारांच्या वाहन चालकांना विशेष प्रशिक्षण देणार; मेटेंच्या मृत्यूनंतर सरकारचा मोठा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आणि महामार्गांवर होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य वाढले. या आधीही देशाने आणि राज्यानेही काही नेते अशाच अपघातात गमावले आहेत. त्यामुळेच आज महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व आमदारांच्या वाहन चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. हे प्रशिक्षण शिबीर २४ ऑगस्ट रोजी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पार पडणार आहे.

१४ ऑगस्ट रोजी पहाटे मेटेंच्या गाडीचा अपघात झाला. मात्र त्यांना जवळपास एक तास कोणतीही मदत मिळाली नाही, असं त्यांच्या वाहन चालकाचं म्हणणं आहे. मात्र त्याच्या या दाव्यावर संशय व्यक्त केला जात आहे. याच मुद्द्यावर फडणवीस म्हणाले कि, “मेटे यांच्या चालकाने लोकेशन सांगण्यात गोंधळ केल्यामुळे पोलीस अपघातस्थळी लवकर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठीच हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.” या शिबिरात राज्यातील सर्व आमदारांच्या वाहन चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्यामुळे भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.

आता पोलिसांना लोकशन कळणार

मेटेंचा अपघाता झाल्यावर त्यांच्या चालकाने पोलिसांना फोन केला होता. त्याने 112 या इमर्जन्सी नंबरवर फोन केला. मात्र त्याला अपघाताचे योग्य लोकेशन सांगता आले नाही. त्याने चुकीचे लोकेशन सांगितल्याने योग्य लोकेशन शोधून तिथपर्यंत पोहोचायला पोलिसांना उशीर झाला. त्यामुळेच येत्या काही दिवसात 112 या इमर्जन्सी नंबरवर फोन केल्यास त्या व्यक्तीचे लोकेशनही पोलिसांना कळेल अशी सिस्टिम बसवण्यात येईल. त्याबद्दल लवकरच कार्यवाही आणि अंमलबजावणी करू, असं आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!