Share

Hasan Mushrif | “बंड केल्यानंतर अजित पवारांच्या नावाने खडे का फोडले?” ; हसन मुश्रीफ सभागृहात आक्रमक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी गुलाबराव पाटील यांना सभागृहात जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बंड केल्यानंतर अजित पवारांच्या नावाने खडे का फोडले?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार यांनी आम्हाला मदत केली, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. ज्यांनी माझ्याकडे पाण्याची योजना आणली. ती काही मी माझ्या घरुन करत नाही. केंद्राचे ५० ट्क्के आपल्याला मिळतात. त्यावेळी अजित पवार यांनी मला वारंवार मदत केली. त्यावेळी ती योजना आम्ही केली.

यावर हसन मुश्रीफ म्हणाले, “पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्हाला सांगितलं की मागच्या सरकारमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला सहकार्य केलं. मग यांचे हे वक्तव्य खरं की गुवाहाटीत अजित पवारांनी अन्याय केला हे खरं”

पैशाशिवाय एकनाथ शिंदे गट काम करीत नाही-

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गट पैशांशिवाय काम करत नाही. शिवसेनेचे प्रामाणिक कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले. मुंबईतील शिवसैनिक कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, देशविरोधी लोकांना धडा शिकवण्यासाठी लोक विधानसभा निवडणुकीची वाट पाहत आहोत. ते म्हणाले की, शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याची हिंमत नाही.

ते खोक्याशिवाय काम करू शकत नाहीत, असे ठाकरे म्हणाले. आमच्याकडेही खोके आहेत, ज्यात शिवसेनेशी प्रामाणिक आणि निष्ठावान लोक भरलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि इतर तांत्रिक मुद्द्यांवर दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!