Share

Jitendra Awhad | “मी कालच सांगितलं होतं हा टाईम बॉम्ब आहे…”; जितेंद्र आव्हाड आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

ठाणे : लोकल हि मुंबई आणि ठाण्याच्या लोकांसाठी एकप्रकारे जीवनदायिनी आहे. एखाद्या दिवशी ही लोकल चुकली तर तेथील नागरिकांना कामावर, महाविद्यालयात किंवा इतर ठिकाणी पोहोचणं अशक्य होऊन जातं. त्यामुळे ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी लोकल ही हि फक्त गरज नसून त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. मात्र याच ठाणेकरांच्या संतापाचा आता उद्रेक होत आहे. कारण आहे एसी लोकलचं. एसी लोकल आणि या लोकलच्या फेऱ्यांचं प्रमाण वाढल्यामुळे साध्या लोकल कमी झाल्या आहेत आणि त्यामुळे कळव्यातील प्रवाश्यांना मोठ्या त्रासाला समोर जावं लागत आहे. त्यांच्या कामाचा खोळंबा होत आहे आणि हाच मुद्दा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उचलून धरला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, “मुंब्रा व कळव्याच्या रेल्वे प्रवाशांना लोकलच्या कमी फेऱ्यांमुळे प्रचंड त्रासला सामोरे जावे लागत आहे. जेवढ्या ट्रेन येतात त्या सगळ्या भरून येतात ट्रेन मध्ये चढता देखील येतं नाही. मुंब्रा, कळव्याला तिसरा व चौथा प्लॅटफॉर्म बांधण्यात आला आहे. पण त्याचा फायदा कुणालाच होत नाही. गेल्या काही दिवसात अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. सरकारने आणि रेल्वे प्रशासनाने या सगळ्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अन्यथा आम्हांला आंदोलनाचा मार्ग मोकळा असेल. लोकांचा उद्रेक होतोय. न सांगता, न बोलवता सुद्धा लोक आंदोलनात उतरत आहेत. हे गांभीर्याने घ्या. मी कालच सांगितले हा टाईम बॉम्ब आहे. मुंबईचे जीवनमान रेल्वेवर चालते हे विसरू नका.”

तसेच त्यांनी हि बाबही निदर्शनास आणून दिली कि, एसी लोकलचा प्रवास करण्यासाठी प्रवाशाच्या एका दिवसाचा खर्च हा जवळपास २०० रुपये इतका होतो. मात्र साध्या लोकलचा महिनाभराचा पास हा केवळ २१५ रुपयांना मिळतो. म्हणजेच साध्या लोकलच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे लाखो नागरिकांचा खोळंबा होत आहे. त्यामुळेच आव्हाड पुढे म्हणाले कि, “साध्या लोकल कमी करून एसी लोकल वाढविण्याचा अर्थ काय? एसी लोकल सर्वसामान्य कष्टकऱ्यांना परवडेल का? त्यापेक्षा साध्या लोकल वाढवा.” तर याच मुद्द्यांवर आव्हाड उद्या डीआरएमला भेटणार असून या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी करणार आहेत. तसेच नागरिकांच्या आंदोलनातही आव्हाड सहभागी होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!