Uddhav Thackeray | मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते वैभव नाईक (Vaibhav Sarnaik) यांनी भाजप (BJP) पक्षावर जोरदार घणाघात केला आहे. मागील महिन्यात नाईक यांना एसीबीकडून नोटीस पाठवून गेल्या 20 वर्षातील माहिती त्यांच्याकडून मागवण्यात आली होती. ही माहिती देण्यासाठी ते एसीबी कार्यालयात आपल्या समर्थकांसह नेते राजन साळवी यांच्यासोबत हजर राहिले आहेत. यावरुनच त्यांनी ही टीका केली आहे.
आमदार प्रताप सरनाईक, भावना गवळी यांना ज्या प्रमाणे दबाव टाकून शिंदे गटात प्रवेश करायला लावला. त्या प्रमाणे आम्ही या नोटीसीला भीक घालणार नाही, असा घणाघात वैभव नाईक यांनी केला आहे.
भाजपची ही एक प्रकारची अघोषीत आणीबाणी आहे. ज्या लोकांना भाजपकडून बोलवलं जात आहे आणि जी लोकं त्यांच्याकडे जात नाहीत. त्यांना अशा प्रकारच्या नोटीस देऊन त्रास देण्याचा कार्यक्रम भाजपकडून सुरू आहे, असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, वैभव नाईक सोबतच त्यांच्या पत्नीला आणि भावालाही नोटीस देण्यात आली आहे. मात्र ही नोटीस देण्यात आली असली तरी आम्ही पोलिसांना सर्व माहिती देऊन सहकार्य करणारच आहोत, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Bacchu Kadu | “एकतर राजा व्हायचं नाही अन् झालं तर…”, बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना टोला
- Ambadas Danve | अन् महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तोंड बंद करुन बसले ; अंबादास दानवेंची टीका
- Shambhuraj Desai | “बेळगाव दौरा अद्याप तरी रद्द केलेला नाही”, शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण
- Chandrashekhar Bawankule | “उद्धव ठाकरेंनी आता फक्त काँग्रेसची घटना त्यांच्या पक्षाची करावी”; बावनकुळेंची बोचरी टीका
- Devendra Fadanvis | सीमा वादावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…


