🕒 1 min read
Ambadas Danve | मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास योग्य ती कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी दिला. यापूर्वी देखील बोम्मई यांनी हा इशारा दिला होता. यावर राज्यातील सत्ताधारी गप्प आहेत. दरम्यान शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
अंबादास दानवे म्हणाले, “महाराष्ट्र सरकार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या धमक्यांना घाबरत आहे. हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. कारण छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज हल्ले करत आहेत, टीका करत आहेत. जत मध्ये पाणी सोडले आहे. सोलापूर, अक्कलकोट आमचे आहे म्हणतात. अन् महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तोंड बंद करुन बसले आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सडोतोड उत्तर देण्याची गरज आहे. संजय राऊत चांगले म्हणाले, जत तालुक्यात सोडलेल्या पाण्यात या मंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने जीव दिला पाहीजे.”
मुख्यमंत्री बोम्मई यांचा इशारा –
मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, “महाराष्ट्राच्या मंत्र्याने राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा दौरा सध्याच्या परिस्थितीत योग्य नागही. त्यांच्या दौऱ्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल. महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा दौरा म्हणजे चिथावणीखोर कृत्य आहे. शिवाय, हे लोकांच्या भावना भडकवण्यासारखे आहे.”
महाराष्ट्र राज्यासोबतचा सीमावाद हा कर्नाटकसाठी बंद झालेला अध्याय आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांमध्ये एकोपा आहे. तसेच सीमेचा वाद आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात देखील आहे, असे बोम्मई म्हणाले.
भाजप-शिवसेना युती सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी 6 डिसेंबर रोजी बेळगावला भेट देणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shambhuraj Desai | “बेळगाव दौरा अद्याप तरी रद्द केलेला नाही”, शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण
- Chandrashekhar Bawankule | “उद्धव ठाकरेंनी आता फक्त काँग्रेसची घटना त्यांच्या पक्षाची करावी”; बावनकुळेंची बोचरी टीका
- Devendra Fadanvis | सीमा वादावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Basavaraj Bommai | …तर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही ; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना पुन्हा इशारा!
- Uddhav Thackeray | “महाराष्ट्राचे 2 मंत्री कर्नाटक सरकारच्या सुरक्षेसाठी काम करतात”; ठाकरे गटाचा निशाणा कुणावर?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
