Chandrashekhar Bawankule | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
“उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष संपवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या सर्व करून टाकल्या आहेत. आता फक्त काँग्रेस पक्षाच्या घटनेची झेरॉक्स काढून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची करावी. एवढंच शिल्लक राहिलंय, बाकी सर्व झालंय,” असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
दरम्यान, बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीशी उद्धव ठाकरे युती करणार असल्याची चर्चा आहे. यावर देखील चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच आहेत. आज केवळ दाखवण्यासाठी एकत्र बसतील. हे सर्व आतून एकच आहेत”, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलाय.
“कोणतीही मतं कोणाची जहागिरी नाही. जेव्हा लोकांना वाटतं की हा पक्ष आमच्या हिताचा आहे तेव्हा ते त्या पक्षाला मतं देतात. कोणी म्हणत असेल की मागासवर्गीय मतं माझ्याकडे गठ्ठा आहे आणि मी इकडे देणार, तिकडे देणार, तर मतदार आता कधीही कोणाच्या म्हणण्यावर इकडे तिकडे जात नाही”, असंही ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “महाराष्ट्राचे 2 मंत्री कर्नाटक सरकारच्या सुरक्षेसाठी काम करतात”; ठाकरे गटाचा निशाणा कुणावर?
- Thackeray-Ambedkar | ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर आज होणार निर्णय? आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष
- Hair Care | हिवाळ्यामध्ये केसांना मऊ ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ दालचिनीचे हेअरमास्क
- Chandrashekhar Bawankule | “ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच”; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
- PAK vs ENG | इंग्लंडला मोठा झटका! लियाम लिव्हिंगस्टन पाकिस्तान दौऱ्यातून बाहेर


