Share

Bacchu Kadu | “एकतर राजा व्हायचं नाही अन् झालं तर…”, बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

Bacchu Kadu | मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी, उद्धव ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्री बनवण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माणसानं एकतर राजा व्हाचं नाही आणि झालं तर आळस कराचा नाही.. नाही तर अशा राजाचं राज्य टिकत नाही, हे आपण दाखवून दिलं, असा खोचक टोला बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तसेच, प्रामाणिकता महत्त्वाची आहे. मी राजा झालो म्हणून झोपायचं, ठरलेल्या वेळातच भेटायचं, असं चालणार नाही, असं देखील कडू म्हणाले.

अमरावतीत बोलताना बच्चू कडू यांनी महिला मुख्यमंत्री बनवण्याच्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांना महिला मुख्यमंत्री करायचा होता तर तेव्हाच करायला पाहिजे होता. तुमच्यापेक्षा बरं राहिलं असतं, असं ते म्हणाले.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा करण्यात आली आहे. आता पूर्ण भारतभर दिव्यांग मंत्रालयाचा पायंडा पडणार असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाने दिव्यांग मंत्रालय केलं आता पूर्ण भारतभर व्हावं, यासाठी आम्ही लढा उभारणार असल्याचं कडू म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!