मुंबई : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
आता राज्यातील निर्बंध पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं आहे. आज राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबत भाष्य केलं आहे. राज्य सरकार रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या विचारात असून येत्या ४ दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच, रेड झोनमधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर त्या जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन कायम राहणार, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
दरम्यान, मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर देखील ठाकरे सरकारने राज्यातील स्थिती लक्षात घेता टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवला होता. यावेळी देखील कडक निर्बंध हे टप्प्याटप्प्याने शिथिल केले जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून १ जूननंतर लॉकडाऊन न वंध्यत्वत व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
त्यामुळे यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकार प्रथम दुकाने सुरू करण्याच्या तयारीत आहे. मात्र, यासाठी जिल्ह्यातील वा त्या शहरातील कोरोना स्थिती पाहून हा निर्णय घेण्यात येईल. तसेच, ठराविक वेळातच दुकानं सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात येईल.
यानंतर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार आणि दारुची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. तर, चौथ्या टप्प्यात सामान्य लोकांसाठी लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरू करण्यात येतील. त्यामुळे शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही चौथ्या टप्प्यात सुरु होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, त्यामुळेच ते संभाजीराजेंना भेटले नाहीत’
- रेड झोनमधील ‘या’ १४ जिल्हे वगळता लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता
- सचिनने खराब गोलंदाजी करायला सांगितल्याचा पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूचा खळबळाजनक दावा
- मराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची कोल्हापुरातून सुरुवात !
- वडेट्टीवारांच्या बोलण्याला किंमत नाही, त्यांना ओबीसी नेता होण्याची घाई; मेटेंचा प्रहार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

