मुंबई : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये घट होत असून कोरोना मुक्तांचा आकडा हा अधिक आहे. मात्र, अद्यापही राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या हि तीन लाखांपार असून दररोज रुग्णांमध्ये होणारी वाढ ही देखील आटोक्याबाहेर आहे. अशातच, तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला असून लहान वयोगटातील मुला-मुलींना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आता राज्यातील निर्बंध पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं आहे. आज राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबत भाष्य केलं आहे.
राज्य सरकार रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या विचारात असून येत्या ४ दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच, रेड झोनमधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर त्या जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन कायम राहणार, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
रेड झोनमध्ये कोणते जिल्हे ?
बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद.
महत्वाच्या बातम्या
- ‘पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, त्यामुळेच ते संभाजीराजेंना भेटले नाहीत’
- अमृता सिंगसोबत साखरपुड्यानंतर मोडले होते रवी शास्त्री यांचे लग्न
- ‘राज्य सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही’, काँग्रेसचा सेना, राष्ट्रवादीला इशारा
- उत्तर प्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’
- “मोर्चा काढणार म्हणजे काढणार, तुम्ही परवानगी द्या नाहीतर नका देऊ!”, आ. मेटेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

