🕒 1 min read
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेत्यांनी बैठका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात असल्याचं सांगितलंय. तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले आहेत.
दरम्यान, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मागील काही विधानांवरून मराठा नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता मूक नव्हे तर बोलका मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे .यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे.
‘विजय वडेट्टीवार यांना ओबीसींचा नेता होण्याची घाई झाली आहे. त्यांच्या बोलण्याला काहीच किंमत नाही, असा प्रहार मेटेंनी केलाय. पुढे त्यांनी, ‘काँग्रेसमध्ये ओबीसी नेता होण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. वडेट्टीवार मोठे की नाना पटोले मोठे यावरून काँग्रेसमध्ये वाद आहे,’ असा आरोप देखील केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, त्यामुळेच ते संभाजीराजेंना भेटले नाहीत’
- रेड झोनमधील ‘या’ १४ जिल्हे वगळता लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता
- सचिनने खराब गोलंदाजी करायला सांगितल्याचा पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूचा खळबळाजनक दावा
- मराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची कोल्हापुरातून सुरुवात !
- कोरोनाच्या काळात स्पॉट बॉयच्या मदतीला धावुन आला स्वप्निल जोशी


