पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला खासदार संभीजीराजे छत्रपती यांनी चांगलेच खडेबोल सुनावले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळा पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील भाजपला लक्ष्य केलं होतं. संभाजीराजे हे आता आक्रमक झाले असून येत्या २७ तारखेला ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. यामुळे मराठा समाजाचं लक्ष संभाजीराजेंच्या भूमिकेकडे असून याआधीच शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ५ जूनला मोर्चा काढणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी यांनी संभाजीराजेंच्या नाराजीवर भाष्य करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांची भेट का नाही झाली ? याच कारण देखील स्पष्ट केलं आहे. ‘मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजेंशी भेट होऊ शकली नाही,’ असं विधान माध्यमांशी बोलताना केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाअभावी शिक्षणाची संधी हुकली; धुळ्यात विद्यार्थ्याची आत्महत्या
- मोदींच्या अश्रूंची खिल्ली उडवणार्यांवर बरसली कंगना, म्हणाली…
- देवमाणूस : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देणार रतन टाटा आधार
- चित्रपटात भूमिकेसाठी फोन केलेल्या दिग्दर्शकाला गागुंलीने दिले ‘असे’ उत्तर
- मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बाधण्याचा प्रयत्न करणारे मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

