Share

सचिनने खराब गोलंदाजी करायला सांगितल्याचा पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूचा खळबळाजनक दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत पाकिस्तान हे क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा अत्यंत अटीतटीचा सामना पहायला मिळतो. दोन्ही क्रिकेट संघासाठी क्रिकेटचा सामना म्हणजे जणु धर्मयुद्धच. भारत पाकिस्तान सामना बहुतेक वेळा भारतीय फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी असा होतो. काही दिवसापुर्वी पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटुने भारताचा महान क्रिकेटपटु सचिन तेंडुलकरबाबत एक धक्कादायक विधान केले आहे.

पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू सईद अजमलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सचिन तेंडुलकरने एकदा त्याला खराब गोलंदाजी कर म्हणून सांगितले होते. असा दावा केला आहे. या मुलाखतीत तो म्हणाला की, ‘इंग्लंडमध्ये एकदा मी आणि सचिन एमसीसीसाठी २०१४ मध्ये एक प्रदर्शनीय सामना खेळत होतो. त्यावेळी मी गोलंदाजी करताना चांगले प्रदर्शन केले आणि चार गडी बाद केले होते. यानंतर सचिन माझ्याजवळ आला’ आणि म्हणाला, ‘हा सामना केवळ मनोरंजनासाठी आहे, इतक्या गंभीरतेने गोलंदाजी करु नको, येथील प्रेक्षकासाठी हा सामना संध्याकाळपर्यंत सुरु राहिला पाहिजे. पण तु चांगली गोलंदाजी केली तर सामना लवकर संपेल.’ असे म्हणाला.

यावर उत्तर देताना सईद म्हणाला की, ‘मी ज्या फलंदाजांना गोलंदाजी केली ते जागतीक दर्जाचे होते म्हणून मी माझी सर्वोत्तम गोलंदाजी केली.’ यावर सचिनने सांगितले की या सामन्यातून मिळणारा निधी गरजुसाठी दिला जाणार आहे. जर सामना जास्त वेळ चालला तर त्यांना जास्त निधी देता येईल असे अजमल म्हणाला. हे कारण ऐकल्यानंतर मी साधारण गोलंदाजी केली होती असे सईद अजमलने सांगितले. २०१४ मध्ये एमसीसी इलेव्हन विरुद्ध रेस्ट ऑफ वर्ल्ड सामन्यात सचिन एमसीसीचे नेतृत्व करताना केले होते. लंडन येथे झालेल्या या सामन्यात एमसीसीने ७ गडी राखुन विजय मिळवला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!