Share

मराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची कोल्हापुरातून सुरुवात !

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेत्यांनी बैठका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात असल्याचं सांगितलंय. तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले आहेत.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोरोना काळातील गांभीर्य ओळखून संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, यानंतर चाललेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर संभाजीराजे हे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हीच भूमिका असून आता महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जाऊन मराठा समाजाच्या भावना समजून घेणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.

यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते २७ तारखेला आपली भूमिका जाहीर करतील असं देखील सांगितलं आहे. दरम्यान, संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची आज कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. संभाजीराजे यांनी एका पोस्टद्वारे आपल्या दौऱ्याबाबत भाष्य केलं आहे.

https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/1880709068753970

‘आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेण्यासाठी व ती राज्य सरकार व केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील जास्तीतजास्त लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. कोल्हापूरातील इतर समाजातील प्रतिनिधींनी देखील या प्रसंगी उपस्थित राहून मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिला. या सर्वांचा मराठा समाजाच्या वतीने
मी अत्यंत ऋणी आहे,’ असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!