गुवाहटी: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन झालं आहे. आसामचे आरोग्य मंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. त्यानंतर गोगोई यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
Former Assam CM and Congress leader Tarun Gogoi ( in file photo) passes away in Guwahati, announces state health minister Himanta Biswa Sarma pic.twitter.com/UBn3AS2CEF
— ANI (@ANI) November 23, 2020
गोगोई यांच्या निधनाबद्दल आसाम सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
तरुण गोगोई हे आसामचे यशस्वी मुख्यमंत्री व लोकप्रिय नेते होते. मुख्यमंत्रीपदाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी आसामच्या विकास प्रक्रियेत मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे आसामने तसेच देशाने एक अनुभवसंपन्न व अभ्यासू नेता गमावला आहे. गोगोई यांना श्रद्धांजली वाहतो तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
दरम्यान,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा आसाममध्ये शांतता प्रस्थापित करण्यात सिंहाचा वाटा राहिला आहे. आसामचे तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी राज्याच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने एक अनुभवी, संयमी, लोकप्रिय व निष्ठावान नेतृत्व हरपले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.
गोगोई हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन दहावीत असतानाच राजकारणाकडे आकर्षित झाले. महाविद्यालयात असताना ते भारत युवक समाजाच्या आसाम विभागाचे सक्रिय कार्यकर्ते होते. १९७१ मध्ये जोरहाट मतदारसंघातून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले आणि पुढे सहावेळा ते खासदार म्हणून निवडून गेले.
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार, आमदार, केंद्रीय मंत्री, आसामचे तीन वेळा मुख्यमंत्री अशी त्यांची यशस्वी कारकिर्द राहिली आहे. ते कुशल प्रशासक होते. त्यांच्या निधनाने आसामची व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून देशाच्य़ा राजकारणात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी गोगोई कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, अशा भावना व्यक्त करुन थोरात यांनी गोगोई यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’; मनसेचा हल्लाबोल
- योग्य वेळ आल्यावर मराठा आरक्षणावर बोलणार – उदयनराजे
- कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : उद्धव ठाकरे
- ‘ज्या राज्याचा मुख्यमंत्री घरीच बसून असतो, ते राज्य नेहमीच धोक्याच्या वळणावर असते’
- शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

