🕒 1 min read
पुणे : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी पुण्यात आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली.
‘राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,’ अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.दरम्यान, या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला. चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. मला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करायची नाही. पण शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये, अशी टीका करतानाच तुम्ही निखारा टाकला तर आम्ही वणवा पेटवू, असा इशारा कोल्हे यांनी दिला. देशात त्यांचा वरचष्मा आहे असं त्यांना वाटतंय. त्यामुळे त्यांना आता इंगा दाखवण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखीलचंद्रकांत पाटील यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, अशी घणाघाती टीका केली. त्यामुळेच श्री. पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत, असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटलांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्नासारखी……
चंद्रकांत पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखे खुळ्यासारखं बडबडत आहेत!
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल घेतला खरपूस समाचार????https://t.co/BUhipvCeaE pic.twitter.com/pP4Qcn6DeE— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) November 23, 2020
मुश्रीफ म्हणाले,चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल आजरा येथे झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रचार मेळाव्यात खरपूस समाचार घेतला.चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा केवढी मोठी संधी मिळाली होती. किती भाग्यवान आहेत ते. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही.
मुश्रीफ म्हणाले,बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. दहा ते बारा लोकसभेच्या व दहा ते बारा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या.देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत.
दरम्यान,मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मला पवार साहेबांबाबत असं बोलायचं नव्हतं,” अशा शब्दांत पाटील यांनी सारवासारव केली आहे.टीका करून शरद पवार यांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र तुम्ही मोदींवर, अमित शाहांवर बोललेले चालते. तुमचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का? असा प्रतिसवाल करत करत चंद्रकात पाटील यांनी आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर तर आरपीआयचा उपमहापौर निवडुन येईल’
- बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये वाढीव वीज बिल विरोधात आंदोलन
- ‘चंपा’चे ‘ते’ वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे,अजितदादांचा पलटवार
- IND vs AUS : पहिल्या कसोटी सामन्यात रोहित-इशांत खेळणार का? अजूनही संभ्रम कायम
- ‘तोरबाज’ चित्रपटात संजय दत्त दिसणार ‘मसीहा’च्या भूमिकेत…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
