🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जहरी टीका करत असतांना पक्षाच्या पदाधिकारांच्या बैठका राऊत यांनी घेतल्या आहेत. यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिशद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असतांना संजय राऊत यांनी नाशिक (Nashik) येथील खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना टोला लगावला आहे.
हेमंत गोडसे हा काय चेहरा होता का ? शिवसेना हे नाव चेहरा आहे, शिवसेना नावाची चार अक्षरं चेहरा आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. याशिवाय जे सोडून गेले आहे त्यांनी त्यांची राजकीय कबर खोदली आहे. असं म्हणत असतांना संजय राऊत यांनी ते प्यारे झाले आहे , अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
तसेच, मी खात्रीने सांगतो, माझा शब्द आहे. ज्या भागातील जे खासदार आणि आमदार निवडून गेले त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं. खासदार गोडसे यांचं तर राजकीय करीयरच संपलं आहे. आम्हीच ती जागा लढवली होती. जे आमदार गेले. नांदगावपासून मालेगावपर्यंत त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं ना, असं देखील राऊत म्हणाले.
दरम्यान, हा आत्मविश्वास कुठून येतो. आम्ही फिरतो. लोकांमध्ये बसतो. त्यातून त्यांची चीड दिसत आहे. त्यावरून आत्मविश्वास येतो. सर्व जागेवर आहे. काही पालापाचोळा उडून गेला असेल. तो उडतच असतो. आज या गटात उद्या त्या गटात. हे काही नवीन नाहीये. शिवसेना आहे तशीच असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | “अंधारे बाई तर कहरच करतात, निष्पापांच्या घरावर डल्ला मारणाऱ्या…”; शिंदे गटाचा जोरदार हल्लाबोल
- NCP on Tanaji Sawant | आरोग्य मंत्र्यांना त्यांचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसे सांभाळणार ; राष्ट्रवादीचा सवाल
- Sambhajiraje Bhosale | उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता संभाजीराजे भोसले राज्यपालांवर संतापले, म्हणाले…
- Udayanraje Bhosale | “तुमच्या आई-वडिलांना कोणी बोललं तर…”; ‘त्या’ प्रकरणावरून उदयनराजे संतापले
- Sanjay Gaikwad | “मादxxx” ; संजय गायकवाडांची जीभ घसरली, संजय राऊतांना थेट शिवीगाळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
