मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आकड्यांची जुळवाजुळव कशी करायची यापासून ते युती आघाडी कोणासोबत करायची याबाबत उभयबाजू तयारी करत आहेत.
नुकतेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल उत्सुकता वाढवणारं विधान केलं. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मनसेवर गंभीर आरोप केलेत. मनसे भाजपबरोबर जाणार ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे मला माहित नाही. मात्र मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही, असे सांगत मनसे हा सुपारीवर चालणारा पक्ष असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलाय.
मनसेला कुणाची तरी सुपारी घ्यावीच लागेल. त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच त्याच्यावर आहे. आज ना उद्या कुणाची तरी सुपारी घ्यायची आहे. वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झाली. आता ज्या भाजपच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणून उघडं नागडं केलं. आता त्याच नागड्याबरोबर उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ते कदाचित पुढे दिसेल, अशी खिल्ली अनिल परब यांनी मनसेची उडवली आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’ असल्याची खोटक टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसेनं जे केलं ते उघडपणे केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना ही धोकेबाज सेना झाल्याचा हल्लाबोल देशपांडे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू : हसन मुश्रीफ
- बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये वाढीव वीज बिल विरोधात आंदोलन
- कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : उद्धव ठाकरे
- ‘ज्या राज्याचा मुख्यमंत्री घरीच बसून असतो, ते राज्य नेहमीच धोक्याच्या वळणावर असते’
- शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

