Share

कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केले. ते समाजमाध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना केले.

महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर आहोत. दिवाळीनंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे पण तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही, दुसरी तिसरी लाट येऊ शकते. कृपा करून सगळं सुरू केलं म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही हे लक्षात घ्या असंही मुख्यमंत्री म्हणाले.

यंदा दसऱ्याला शिवसेनेचा मेळावा देखील शिवतीर्थावर मोठेपणाने साजरा न करता साधेपणाने केला, मी आपला मुख्यमंत्री आहे त्यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान.’ असे असू नये म्हणून नियम माझ्यापासून काटेकोरपणे पाळले नाही तर तुम्हाला काही सांगायचा अधिकार नाही. दिवाळीत फटाके वाजवू नका असे मी सांगितले आणि आपण माझे ऐकले आणि यंदा खूप कमी फटके उडाले. प्रत्येक गोष्टींसाठी कायदे करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!